Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

वेगळेपण

 बोलावे एकदा या निशब्द मनाने उधवस्त करावे या वादळाने जीवनात गुंतलेला गुंता तोडावा शब्दआघाताने मावळून घ्यावे काळीज माझे या क्षितिजाणे अपेक्षाचा जाळ  करावा या काळोखाने....                          कधी कधी हे समजणे खूप अवघड होते कि आपल्याला काय झाले आहे,आणि  जे झाले आहेत ते लवकरात लवकर कळले तर फारच चांगले,सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात, त्यांच्यात आचार विचार, स्वभाव, आवडी निवडी, राहणी, वागणे अश्या कित्येक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्ती पेक्षा वेगळी असते, आणि हे वेगळेपण समजून घेणे गरजेचं असते,पण वेगळेपण समजून घेणे हे सहजासहज सोपे नसते, आणि ते वेगळे पण समजुनही घेतले तरी ते स्वीकारणे फार अवघड असते.                      म्हणून ज्या दिशेने या समाजाचा प्रवाह वाहत जातो आपण त्यात सामावून वाहत जात असतो, या प्रवाहत वाहत असताना आपल्यात असणार वेगळेपण आपल्या आड येते , बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध असतात आणि मनाविरुद्ध जाण आपल्याला मान्य नसते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्य...

प्रवित्र तुळशी माळ..

                    साधारण दिसणारी ही तुळशी माळ भक्ती,शक्ती,सामर्थ्य, शांती, एकाग्रतेणे ने भरलेली असते, ज्याला हवा तो त्याचा तसा उपयोग करतो,धारण करतो.                                      तुळशी माळ धारण करणारी व्यक्ती ही साधू किंवा महाराज असते असे नाही आहे, बऱ्याच लोकांच्या मनात हा गैरसमज असतो. साधारण व्यक्ती तुळशी माळ धारण करू शकते, पण फॅशन म्हणून तुळशी माळ धारण करू नका.                 तुळशी माळ धारण करणे म्हणजे पुण्यप्रद समजले जाते, कारण तुळशी माळ ही गुरु शिवाय धारण करू नये, गुरुदेव जेव्हा गुरु मंत्र आपल्या कानात सांगते आणि आपल्याला माळ धारण केली जाते तेव्हा त्याला माळेचे आपल्याला फळ प्राप्त होईल.               अंतःकरणात सामर्थ्य समाविष्ट होते,म्हणून फॅशन च्या प्रवाहात तुळशी माळेला वाहून नका नेऊ, गुरु शिवाय तुळशीमाळ धारण करणे अयोग्य आहे.         ...

ती....

 अचानक वळणावळणाच्या निशब्द प्रवासामध्ये कोणीतरी स्मित हास्य करत आलं, काय जादू केली माहित नाही,पण मन सारखं हसु लागलं.. बोलायला निखळ पाण्यासारखी, असं वाटतं वाहून जाव तुझ्या बोलण्यात,   वागायला अगदी लहान मुली सारखी, असं वाटतं स्वताला विसराव तुझ्यात..  जनु अंधाराला उजेड मिळाला असं सारखं वाटतयं,   जस निरंतर शांततेत सुमधुर संगीत वाजत असं वाटतयं.. तुझ्या निरागस्य हसण्यामध्ये सार काही विसरूण हसाव वाटतयं, तू काय केलं माहित नाही, पन मन तुझ्या विचारामध्ये स्वच्छंद पक्षा प्रमाणे उडतयं, तुझी ती हवी हवीशी सोबत नेहमी साठी हवीशी वाटतय.. असा एकही दिवस नाही जो मी तुझ्याशी बोलल्या शिवाय राहत नाही, तुझा बोललेला शब्द हृदयामध्ये घर  केल्या शिवाय जात नाही.. हळवीशी चाहुल लागली की तुझाचं आभास होतो,  का कळेना नेहमी देवाकडे मी तुलाच मागतो.. खरच सांगतो आता तुझी खूप सवय झाली, तू दूर जाण्याची सततची भीती लागायला लागली....

`ती´ चा प्रसंग

        सहजच एका दिवशी बाहेर जाण्याचा योग आला. तस मला भाऊगर्दीत जाण्यास फारस काही आवडत नाही, पण या कोरोना महामारी मुळे घरच्या घरी बसून खूप त्रासले होते, आणि ज्या स्थळी जायचे होते तेथील निसर्ग रम्य वातावरणाने भरलेला होता. मनात लोभ भरला निसर्गाचा आस्वाद घेण्याचा, आणि त्यात आग्रह सुद्धा.                                                                           कार्यस्थळी पोहचले, गर्दी पाहून थोडं घाबरल्या सारखं झालं. मला गर्दी ची भीती नाही लागत पण आपल्या नातेवाईकांची गर्दी म्हटलं कि, होतेच ते.त्यांच्याशी बोलण भेटणं सुरु झालं, त्यांच्यात बोलण यात माझा रस नव्हता. मला फक्त माझी उपस्थिती दर्शवाची होती आणि तेथून लगेच निसर्गसान्नीध्यात, पण माझी सुटका होने थोडे कठीनच वाटतं होते,मी इकडे तिकडे पाहले आणि हॉलच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले, तरीही नातेवाईक या जाळ्यात मी अडकले  होते, नशीब मा...
 एक बार मुस्कुरा दे माँ ना रूठ जाना तुम मुझसे माँ यही दुवा करू मैं खुदा से माँ बिछड़ना ना मत तुम मुझसे माँ मुशकिलों में भाम लेना हात मेरा माँ यही दुवा करू मैं ख़ुदा से माँ कभी नही छुप जाना माँ मेरे हर एक सॉस में तेरा नाम माँ यही दुवा करू मै खुदा से माँ तेरी मुस्कुराहट पर जिंदगी वार दु माँ तेरी एक आवाज पर दुनिया भुला दु माँ यही दुवा करू मैं खुदा से माँ चाहे रास्ता कितना भी मुश्किल हो माँ हात रखले सर पर दुनिया भी कदमों मे माँ यही दुवा करू खुदा से माँ..

ताई

  मला सुद्धा एकताई हवी होती, माझ्याशी खुप खुप भांडणारी, बोलणारी, मला रडवता रडवता हसवणारी मला सुद्धा एक ताई हवी होती खुप सारी मस्ती करणारी, मला त्रास देणारी, मला समजणारी माझ्या मनाला जपणारी मला सुद्धा एक ताई हवी होती आई- बाबा रागवल्यावर मला वाचवणारी, माझी चुक असल्यास मला समजुन सांगणारी मला सुद्धा एक ताई हवी होती मि अडचणीत असल्यावर माझा हात घरूण नविन वाट दाखवणारी, थोडीसी रागवणारी, माझ्याही पेक्षा हट्टी असणारी, खरंच मला सुद्धा एक ताई हवी होती..

आई

आई तुझ्याशिवाय, करमत नाही मला तू गेली निघूनी,मन हतबत झाले, एकटेपणाचे हे मौन, नयन बंद झाले. घर आवरताना  हात पाय झाले वाकडे, तुझी आठवण येता, निघतात तांदळात खडे. तुझ्याशिवाय मला, झोप का येईना, रात्रीचा अंधकार, मला झोपु का देईना. घरातल्या अंगणाला, नाही शेणसडा पाणी, तुळस गेली वाळून, त्याला नाही पाणी. तांबडी ऊन निघाल्यावर, दाराजवळ उभा राही, वाटे कडे पाहता-पाहता, तुझ्या स्मरणाने बेचैन राही. आठवणी त्या जुन्या, जतन करूणी ठेवल्या. स्मरण झाले आज मला, नकळत त्या ओठावरती आल्या..