आई तुझ्याशिवाय, करमत नाही मला
तू गेली निघूनी,मन हतबत झाले,
एकटेपणाचे हे मौन, नयन बंद झाले.
घर आवरताना हात पाय झाले वाकडे,
तुझी आठवण येता, निघतात तांदळात खडे.
तुझ्याशिवाय मला, झोप का येईना,
रात्रीचा अंधकार, मला झोपु का देईना.
घरातल्या अंगणाला, नाही शेणसडा पाणी,
तुळस गेली वाळून, त्याला नाही पाणी.
तांबडी ऊन निघाल्यावर, दाराजवळ उभा राही,
वाटे कडे पाहता-पाहता, तुझ्या स्मरणाने बेचैन राही.
आठवणी त्या जुन्या, जतन करूणी ठेवल्या.
स्मरण झाले आज मला, नकळत त्या ओठावरती आल्या..
Comments
Post a Comment