सहजच एका दिवशी बाहेर जाण्याचा योग आला. तस मला भाऊगर्दीत जाण्यास फारस काही आवडत नाही, पण या कोरोना महामारी मुळे घरच्या घरी बसून खूप त्रासले होते, आणि ज्या स्थळी जायचे होते तेथील निसर्ग रम्य वातावरणाने भरलेला होता. मनात लोभ भरला निसर्गाचा आस्वाद घेण्याचा, आणि त्यात आग्रह सुद्धा.
कार्यस्थळी पोहचले, गर्दी पाहून थोडं घाबरल्या सारखं झालं. मला गर्दी ची भीती नाही लागत पण आपल्या नातेवाईकांची गर्दी म्हटलं कि, होतेच ते.त्यांच्याशी बोलण भेटणं सुरु झालं, त्यांच्यात बोलण यात माझा रस नव्हता. मला फक्त माझी उपस्थिती दर्शवाची होती आणि तेथून लगेच निसर्गसान्नीध्यात, पण माझी सुटका होने थोडे कठीनच वाटतं होते,मी इकडे तिकडे पाहले आणि हॉलच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले, तरीही नातेवाईक या जाळ्यात मी अडकले होते, नशीब माझं दुसरं काय म्हणावं विचार करून काय निघाले आणि घडले काय, संतापुन तेथेच बसले राहले मी,इकडे तिकडे पाहत असताना अचानक ती सोमोर आली साधारण कपडे छानसी साडी घालून होती,तिथे दागिना्यांनी मळळेल्या स्त्रियात ती एकटीच साधी आणि देखणी दिसत होती ,फोटो काढण्यासाठी ती स्टेज च्या कोपऱ्यात उभी होती स्टेज वरील गर्दीत ती दबलेली होती, किंवा महागडी वस्त्र आणि दागिना्यांनी तिच्या साधेपणाला तिथे जागाच नव्हती दिली, असं म्हटलं तरी चालेल.माझी मात्र बाहेर जाण्याची तळमळ संपली,ती सगळ्यांशी हसत बोलत होती त्यामुळे तिचे सोंदर्य आणखी निखरत होत,पण त्या स्त्रीयांच्या घेऱ्यात तिच्याबद्दल कुजबुज सुरु होती, टीका करणे सुरु होते, तिला सुद्धा माहित होते आपल्या साधेपणाला इथे जागा नाही म्हणून, ती घाबरलेली होती, पण मनमोकळेपणाने सर्वांशी बोलत होती, मी तुम्हाला विचारते खरच साजशृंगार,दागिने, महागडे वस्त्र यांच्या सोमोर साधेपणाच्या गोडवा हा नकोसा असतो का?
निरागस होती ती,तिचा चांगुलपणा तिथे कोणालाही नको होता, विचारात गुंतलेलि मी सहज बाहेर निघून आलि, रात्रीचे आठ वाजले होते, पौर्णिमा होती त्यामुळे स्वच्छ चंद्रप्रकाश पडलेला होता,आणि त्यात थंडीही. मी चालत चालत थोडे हॉल पासून थोडे दूर निघाले, मला दुरवर शेकोटी पेटलेली दिसली थंडी खूप होती म्हणून मी तेथे गेलि,एक पूर्ण कुटुंब त्या शेकोटी भोवती बसलेल होत,आणि त्या कुटूंबातील मुलेमुली, खेळत होते किती तरी वेळ मी त्यांच्या कडे टक लावून पाहत होते, किती मुक्त निवांत जीवन जगत होते ते,कोणत्याही बंधनात न अडकता , छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद साजरा करत होते,त्यांच्या निष्पाप भावनांचा निरागसपणाने माझ्या मनाला मोकडे केले होते, कार्यक्रम संपला होता, दादा माझ्याच येण्याची वाट पाहत होता, कारण मी त्याच्या सोबत घराकडे जात होते, आम्ही जायला निघालो,
चंद्राच्या प्रकाशात सगळं काही उजळून निघालं होत,तिचा साधेपणा आणि निरागसपणा पासून अगोदरच प्रभावीत झालेलि मी आणखीच प्रभावीत झाले,बदल हा शाश्वत सत्य आहे, पण बदल कश्यात घडवायच हे आपल्याला ठरवायचे आहे,लोक बदलली खरी पण त्याचे विचार अजूनही मळलेले आहेत,आज जे मी पाहिलं त्यामुळे माझ्या विचारांची दिशाच बदलून गेली होती.आणि कोनाकडे कस पाहायचं याबद्दल सगळ्याचा दुष्टीकोन हा वेगळाच असतो, असं मनाला समजूण पटवून दिल,आणि डोळे मिटून मन शांत केले..
Comments
Post a Comment