साधारण दिसणारी ही तुळशी माळ भक्ती,शक्ती,सामर्थ्य, शांती, एकाग्रतेणे ने भरलेली असते, ज्याला हवा तो त्याचा तसा उपयोग करतो,धारण करतो.
तुळशी माळ धारण करणारी व्यक्ती ही साधू किंवा महाराज असते असे नाही आहे, बऱ्याच लोकांच्या मनात हा गैरसमज असतो. साधारण व्यक्ती तुळशी माळ धारण करू शकते, पण फॅशन म्हणून तुळशी माळ धारण करू नका.
तुळशी माळ धारण करणे म्हणजे पुण्यप्रद समजले जाते, कारण तुळशी माळ ही गुरु शिवाय धारण करू नये, गुरुदेव जेव्हा गुरु मंत्र आपल्या कानात सांगते आणि आपल्याला माळ धारण केली जाते तेव्हा त्याला माळेचे आपल्याला फळ प्राप्त होईल.
अंतःकरणात सामर्थ्य समाविष्ट होते,म्हणून फॅशन च्या प्रवाहात तुळशी माळेला वाहून नका नेऊ, गुरु शिवाय तुळशीमाळ धारण करणे अयोग्य आहे.
🙏mast
ReplyDeletekhr bolle aapn
ReplyDelete