मला सुद्धा एकताई हवी होती,
माझ्याशी खुप खुप भांडणारी, बोलणारी,
मला रडवता रडवता हसवणारी
मला सुद्धा एक ताई हवी होती
खुप सारी मस्ती करणारी, मला त्रास देणारी,
मला समजणारी माझ्या मनाला जपणारी
मला सुद्धा एक ताई हवी होती
आई- बाबा रागवल्यावर मला वाचवणारी,
माझी चुक असल्यास मला समजुन सांगणारी
मला सुद्धा एक ताई हवी होती
मि अडचणीत असल्यावर माझा हात घरूण नविन वाट दाखवणारी,
थोडीसी रागवणारी, माझ्याही पेक्षा हट्टी असणारी,
खरंच मला सुद्धा एक ताई हवी होती..
Comments
Post a Comment