बोलावे एकदा या निशब्द मनाने
उधवस्त करावे या वादळाने
जीवनात गुंतलेला गुंता तोडावा शब्दआघाताने
मावळून घ्यावे काळीज माझे या क्षितिजाणे
अपेक्षाचा जाळ करावा या काळोखाने....
कधी कधी हे समजणे खूप अवघड होते कि आपल्याला काय झाले आहे,आणि जे झाले आहेत ते लवकरात लवकर कळले तर फारच चांगले,सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात, त्यांच्यात आचार विचार, स्वभाव, आवडी निवडी, राहणी, वागणे अश्या कित्येक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्ती पेक्षा वेगळी असते, आणि हे वेगळेपण समजून घेणे गरजेचं असते,पण वेगळेपण समजून घेणे हे सहजासहज सोपे नसते, आणि ते वेगळे पण समजुनही घेतले तरी ते स्वीकारणे फार अवघड असते.
म्हणून ज्या दिशेने या समाजाचा प्रवाह वाहत जातो आपण त्यात सामावून वाहत जात असतो, या प्रवाहत वाहत असताना आपल्यात असणार वेगळेपण आपल्या आड येते , बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध असतात आणि मनाविरुद्ध जाण आपल्याला मान्य नसते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्या मनात आपण साठून घेत असतो, त्या विचाराची मनात सतत घुटमळ होत राहते, आतून आपल्यात पोखळी निर्माण करते.
मनात रुजवून ठेवेल्या गोष्टीची मनात भीती निर्माण होते,सहाजिकच आहे,आणि वेगळेपण स्वीकारणे आणखी कठीणच वाटते, बऱ्याच गोष्टी गुपित बनून राहतात, वाट तिथेच थांबते,आणि आपण फक्त चालत राहतो हवे तेवढे प्रश्न घेऊन, हे माझ्या सोबतच का होते?यात माझी चूक आहे का?हे का होत आहे? कशासाठी? आणि कश्यामुळे?
खरंतर यातून बाहेर निघने सोपे नसते, पण कुटुंबाची सोबत असेल तर एवढे कठीणही नसते, थोडं समजून, थोडं समजावून घेतल्या जाते, त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन त्यांना समजून घ्यावं, आयुष्याचा एक टप्पा गाठला असेल तरी, पुढे जाण्याची प्रेरणा देऊन त्याची वाट मोकळी करावी....
Mast👍
ReplyDelete