Skip to main content

प्रवित्र तुळशी माळ..

 

       

          साधारण दिसणारी ही तुळशी माळ भक्ती,शक्ती,सामर्थ्य, शांती, एकाग्रतेणे ने भरलेली असते, ज्याला हवा तो त्याचा तसा उपयोग करतो,धारण करतो.
              
                      तुळशी माळ धारण करणारी व्यक्ती ही साधू किंवा महाराज असते असे नाही आहे, बऱ्याच लोकांच्या मनात हा गैरसमज असतो. साधारण व्यक्ती तुळशी माळ धारण करू शकते, पण फॅशन म्हणून तुळशी माळ धारण करू नका.
     
          तुळशी माळ धारण करणे म्हणजे पुण्यप्रद समजले जाते, कारण तुळशी माळ ही गुरु शिवाय धारण करू नये, गुरुदेव जेव्हा गुरु मंत्र आपल्या कानात सांगते आणि आपल्याला माळ धारण केली जाते तेव्हा त्याला माळेचे आपल्याला फळ प्राप्त होईल.
              अंतःकरणात सामर्थ्य समाविष्ट होते,म्हणून फॅशन च्या प्रवाहात तुळशी माळेला वाहून नका नेऊ, गुरु शिवाय तुळशीमाळ धारण करणे अयोग्य आहे.

                          

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

होळी

 धगधगती ज्वाला उठती, प्रज्वलित त्या फुलत्या, दहन होई सर्व दोष, हर्ष सरे दुःखाच्या! पंचमहाभूते नाचती, मंत्र गजर तो दाटला, रंगांच्या त्या वर्षावाने, आनंद सारा सांडला! धूळवडीच्या सकळ क्षणी, रंग जाहले इंद्रधनू, गुलालाच्या त्या स्पर्शाने, विरघळले सर्व मनू! भाव स्नेह अन् प्रेम गहिरे, हास्य हास्य लय दाटे, जग उजळे रंगोत्सवाने, सुख सिंधू मनी लाटे! शिशिर गेला, वसंत हसला, फुलांवरी ती मोहरली, होळीच्या त्या ज्वाळेमध्ये, काळोखी सारी हरली!