Skip to main content

लहानपण

         लहानपण आठवत का? प्रश्नच नाही लहानपण म्हटलं कि,  डोळ्यासोमोर सुंदरसं  चित्र दिसते  होणं. हो  नक्कीच..  आईच ते निखळ प्रेम, बाबाची ती मिठी, दादा सोबत फिरणं, आणि शाळेतून आल्यावर लगेच आपल्या मित्रांसोबत खेळने, आपलं ते हसन, रडणं अगदी डोळ्यासोमोर दिसत आणि वाटतं माझं लहानपण मला परत हवं. ना कशाची काळजी नाही कसली जवाबदारी.आजी आजोबांचे आपण खूप लाडके असतो. आणि नातेवाईकाकडून मिळनार प्रेम. अगदी सर्व हवंस करून टाकत. रम्य असं बालपण खरच हवंय परत मला..

            पण असत का सगळ्यांच असं लहानपण. सुंदरसं कि वाटतं हवंय मला परत माझं लहानपण. असते का सगळेच असे म्हणणारे. नाही, नसतं असं लहापण सगळ्यांच नसतं असं.

                  ते म्हणतात न सगळ्यांच नशीब एक सारखं नसतं.एक छोटीसी गोष्ट   घरातील वाद विवाद त्या छोटाश्या मुलाच्या मनावर इतका परिणाम करतो त्याच कोमल मन ते सहनच नाही करू शकत.  त्या छोटासा मनाच्या परस्थिती चा अंदाजा  घेऊ नाही शकत,मनाची घुटमल होणे, ऐकट राहणे, या वादविवाद मुळे त्याचा इच्छा मनातल्या मनात तसाच त्या दबत राहतात, त्याला बोलायचं असते,डोळ्यावर सोमोर होत असलेल्या वादविवाद विषयी तो  प्रश्न  करतो त्याला त्याच्या प्रश्नाची  उतारे हवी असते,  पण छोटासा आहे तू तुला काही समजतं नाही असं म्हणून चूप करून दिल्या जाते. का का नाही समजतं तो सगळं त्याच्या सोमोर होते. ते छोटस मन भिते हे का नाही कळत कोणाला त्याला ही कोणा कडून प्रेमाची सहानुभूती ची गरज असते. आणि जस जस मोठे होत जाणार तस तस ते मनातलं मनात ठेवलेल रागात रूपांतर होते. त्या मुलाचं लहानपण फक्त मानसिक त्रास  सहन करत राहते. आणि तो राग त्याच्या वाढत्या वया नुसार वाढत जाते.आणि राहते फक्त त्रास, राग नेहमी साठी...........

        म्हणून नको ते लहानपण परत..

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शांतीचा शून्यबिंदू

         अंतर्मनाच्या ओलसर पायवाटेवरून..      मी त्या असीम शांतीच्या शोधात आहे. अशी शांती, जिला शब्द नाहीत, रूप नाही, ओळख नाही. जिथे मनाचं नितळपणही गहिरं वाटू लागतं आणि भावना सुद्धा एका अपरिचित उंबरठ्यावरच थबकतात. माझ्या आत जे चाललंय, ते या बाह्य जगाशी काहीच साम्य ठेवत नाही. मन म्हणतं, "थांब", पण आत्मा मात्र चालत राहतो. कारण ही चाल "कुठे जाण्याची" नाही. ही चाल आहे, स्वतःपासून दूर जाण्याची.      सततच्या आशा, अपेक्षा, भावनिक ओढी यामध्ये आपण शांतीचा उल्लेख करतो. पण खरंच, ती या सगळ्यांमध्येच आहे का? की या सगळ्यांपासून "मुक्त" झाल्यावर? जसं झाडावर पानं असतात, पण खऱ्या शांततेसाठी झाडावर काहीही नसलं तरी चालतं, तशीच ही अवस्था. ही शांती म्हणजे नकार नाही, हे काही टाळणं नाही; ही एक अंतःस्वरूपातील निर्मोही ओळख आहे,स्वतःच्याही पलीकडची. भगवद्गीतेतील एक श्लोक इथे काळजात खोल जाऊन भिडतो.. "आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्। तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी॥" (गीता – अध्याय २, श्लोक ७०) अर्थ असा — जसा समुद्र ...

तू पारिजात..भाग ३

तू पारिजात..  श्री कृष्णाच्या अंगणात उमलणारी, रुक्मिणीच्या  संसारात हरवणारी, सत्यभामेच्या अहंकारात जळणारी, आणि तरीही, फक्त त्याच्यासाठीच फुलणारी... मी? मी कदाचित कृष्णाचा रथ असावा, तुला उचलून न्यायला धावणारा, की मीच ती बाग, जिथं तू उगवायचीस, आणि मी फक्त वाट पाहायचो— तू केव्हा पडशील आणि मी तुला उचलून धरिन… तू सुगंधाचा श्वास, आणि मी तो वारा, तू अलगद मिटणारी पापडी, आणि मी तुला हलवणारा स्पर्श... पण अखेरचं सत्य काय माहितेय का? तू जेव्हा पहाटे गळून पडतेस, तेव्हा तुझा गंध तरी कुणासाठी उरत असतो? मी उचलायच्या आतच, तू मातीत मिसळून गेलेली असतेस…!

होळी

 धगधगती ज्वाला उठती, प्रज्वलित त्या फुलत्या, दहन होई सर्व दोष, हर्ष सरे दुःखाच्या! पंचमहाभूते नाचती, मंत्र गजर तो दाटला, रंगांच्या त्या वर्षावाने, आनंद सारा सांडला! धूळवडीच्या सकळ क्षणी, रंग जाहले इंद्रधनू, गुलालाच्या त्या स्पर्शाने, विरघळले सर्व मनू! भाव स्नेह अन् प्रेम गहिरे, हास्य हास्य लय दाटे, जग उजळे रंगोत्सवाने, सुख सिंधू मनी लाटे! शिशिर गेला, वसंत हसला, फुलांवरी ती मोहरली, होळीच्या त्या ज्वाळेमध्ये, काळोखी सारी हरली!