लहानपण आठवत का? प्रश्नच नाही लहानपण म्हटलं कि, डोळ्यासोमोर सुंदरसं चित्र दिसते होणं. हो नक्कीच.. आईच ते निखळ प्रेम, बाबाची ती मिठी, दादा सोबत फिरणं, आणि शाळेतून आल्यावर लगेच आपल्या मित्रांसोबत खेळने, आपलं ते हसन, रडणं अगदी डोळ्यासोमोर दिसत आणि वाटतं माझं लहानपण मला परत हवं. ना कशाची काळजी नाही कसली जवाबदारी.आजी आजोबांचे आपण खूप लाडके असतो. आणि नातेवाईकाकडून मिळनार प्रेम. अगदी सर्व हवंस करून टाकत. रम्य असं बालपण खरच हवंय परत मला..
पण असत का सगळ्यांच असं लहानपण. सुंदरसं कि वाटतं हवंय मला परत माझं लहानपण. असते का सगळेच असे म्हणणारे. नाही, नसतं असं लहापण सगळ्यांच नसतं असं.
ते म्हणतात न सगळ्यांच नशीब एक सारखं नसतं.एक छोटीसी गोष्ट घरातील वाद विवाद त्या छोटाश्या मुलाच्या मनावर इतका परिणाम करतो त्याच कोमल मन ते सहनच नाही करू शकत. त्या छोटासा मनाच्या परस्थिती चा अंदाजा घेऊ नाही शकत,मनाची घुटमल होणे, ऐकट राहणे, या वादविवाद मुळे त्याचा इच्छा मनातल्या मनात तसाच त्या दबत राहतात, त्याला बोलायचं असते,डोळ्यावर सोमोर होत असलेल्या वादविवाद विषयी तो प्रश्न करतो त्याला त्याच्या प्रश्नाची उतारे हवी असते, पण छोटासा आहे तू तुला काही समजतं नाही असं म्हणून चूप करून दिल्या जाते. का का नाही समजतं तो सगळं त्याच्या सोमोर होते. ते छोटस मन भिते हे का नाही कळत कोणाला त्याला ही कोणा कडून प्रेमाची सहानुभूती ची गरज असते. आणि जस जस मोठे होत जाणार तस तस ते मनातलं मनात ठेवलेल रागात रूपांतर होते. त्या मुलाचं लहानपण फक्त मानसिक त्रास सहन करत राहते. आणि तो राग त्याच्या वाढत्या वया नुसार वाढत जाते.आणि राहते फक्त त्रास, राग नेहमी साठी...........
म्हणून नको ते लहानपण परत..
chan
ReplyDeletemast
ReplyDelete