आज मला शांत राहायचं आहे, नाही बोलणार, ना कुठे जाणार मला शांती हवी आहे.असं करून होईल का शांत आपण, हे तर मि तुमच्यावरचं सोडते.बर शांतता म्हणजे काय? नेमक हवं तरी काय?आवाज नष्ट झाल्यानंतर असलेली ती शांतता, सरळ सोप्या भाषेत एवढेच, माणूस वरुन कितीही शांत असल्या सारखं वागत असेल तरी तो मनातून अशांतच असतो. जी माणसं समाधानी असेल ती माणसं सुखी माणसं आहे असं म्हणता येईल,म्हणजेच मि याला शांत मनुष्य समजणार, तृप्त झालेला.आता त्याला काहीच नको, पण अशी शांतता प्राप्त करण्यासाठी आपल्याला सतत स्वतःशी लढत राहावं लागणार आहे. मग बघा कोण जिकंणार तर तुमचा स्वार्थ कि तुमची समाधानी वृत्ती,
मला अजूनही माझ्या गुरुजींची एक गोष्ट आठवते, त्यांनी म्हटलं होत कि, पूर्ण शांतता ही स्मशानाच्या पायरीवर जाऊन मिळते. मनुष्य जेव्हा सरणार रचवला जातो. तेव्हा तो पूर्ण शांततेत विलीन होतो. पण माझ्या मते, तो तर आपला शेवट ठरतो ना. तेव्हा तर शांतता मिळनारचन,पण जो पर्यंत आपलं आयुष्य आहे तो पर्यंतच्या काळात आपण शांतता म्हणजेच समाधान नाही मिळवू शकत का? म्हटलं तर आपल्याला जे हवं जे आपल्याला ऐकायचं आहे तेच आपल्याला मिळाल आणि ऐकलं. तर आपण काही वेळेसाठी आपल्याला शांतता मिळते,आणि या उलट झालं तर मग आपण चिडून उठतो मग तर शांतता दूरच............
Chan👌
ReplyDelete