*कोण म्हनतात मला भिती वाटत नाही..*
मला भिती वाटते, मी पाहीलेल्या स्वप्ऩांची,
ती तुटनार तर नाही.
मला भिती वाटते त्या एकटेपनाची,
मी स्वताचं स्व:ताला विसरनार तर नाही.
मला भिती वाटते रुसुन बसलेल्या मैञिनींची,
मैञिचे बंध तुटनार तर नाही.
मला भिती वाटते मैञी च्या सहवासात दुखं विसरण्याची,
मला त्यांची सवय तर लागनार नाही.
मला भिती वाटते मी केलेल्या विश्वासाची,
पुन्हा कोणी विश्वास तोडनार तर नाही.
मला भिती वाटते त्या जुन्या आठवणींची,
मला हसवता हसवता रडवनार तर नाही.
मला भिती वाटते शेवटचा निरोप घेण्याची,
सगळ्यांना सोडुन जातांना माझ्या डोळ्यांतुन
अश्रु वाहनार तर नाही.....
By-S.Bhure.
Comments
Post a Comment