Skip to main content

कल्पनेचं जग

                                           
           मन खुप चंचल असते, सहजासहज ते कधी स्थिर होत नाही. नेहमी मनामध्ये विचारच वादळ थैमान घालत असते, कधी शांत न राहणार आपलं मन ऐक सुंदर विश्व निर्माण  करते. 
           ते सुंदर अद्भुत विश्व म्हणजे कल्पना. मात्र या कल्पनेच्या जगाला वास्तवाची सोबत नसते. या कल्पनेच्या जगात आपण आपल्या मनाने जगतो,राहतो. आपण जे वास्तवात ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही. ते आपण कल्पनेच्या जगात पाहतो आणि ऐकतो.
           कल्पनेच्या जगात विचाराचं बंधन नसते, आणि जगण्याला मर्यादा नसते, सगळं काही अमर्याद असते, ते असते आकाशातल्या पक्षासारखं  स्वच्छंद चारही दिशा फिरून येणार. कल्पनेच्या जगात कोणाचे कोणावरी बंधन नसतात, ते असतं हळवस आपलंच एक जग.
           कल्पना हे अतिशय रम्य, अद्भुत जग आहे, कल्पनेत अस्तित्वात असलेले जग. वास्तवाच्या जगापेक्षा सुंदर विश्व कल्पनेच..
                                                   By-S.Bhure.
                                                   

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

तु

 तुझ्या आठवांनी झोप चोरली, ही रात्र का संपत नाही, मी मनात बोलतो तुझ्याशी, पण तुझं उत्तर का येत नाही. तुझी चाहूल लागते, आणि हवा गोंजारते काही, मी डोळे मिटतो सावकाश, पण स्वप्नात तू दिसतच नाही. तुझं नाव लिहायचं, हात थरथरतो का कुणास ठाऊक, मी आकाशात शोधतो तुला, पण तारा सुद्धा ओळखत नाही. तुझ्या सुगंधात हरवायचं, हे मन रोज ठरवतं, पण दरवेळी त्या वाऱ्याला तुझं ठिकाण सापडतच नाही. तुझं नाव लिहिलं तरी, शब्द का जळत जातात, मी मनात ओतलं पाणी, ते डोळ्यातून का वाहतं. हे असं चालूच राहिलं तर, शब्दही दमून जातील, पण मी तुझीच वाट पाहत कविताच होत जाईन.

सखे साजणी

  सखे साजणी, तू सवय झाली, उगाच मनास भुलवू नको, गेल्या गगनी या सावल्या जरी, पावसास वेडावू नको.. तुझ्या सहवासी मंद वारे, पारिजातही फुलला गडे, स्मरते मजला बोल तुझे ते, पायवाटही खुलली गडे! सांज सभोती झुळूक हलकी, तुझीच चाहूल लागली जशी, स्वप्नांमध्येही तूच यावी, सावली झालीस जशी! मज दूर जाऊ नकोस गं आता, सोसत नाही विरहाचे वारे, सखे साजणी, तू सवय झाली, राहशील ना तू माझ्याच द्वारे?

....

       तुझ्या निरागस हसण्यात मी भान हरपून बसतो,  तुझ्या पाऊलखुणात मी  हळवीशी वाट शोधत असतो. तुझा शब्द छोटा का होईना,  माझ्या हृदयात घर करून असतो,  प्रयत्न का होईना, पण तुझे इवलेसे मन जपत असतो. निशब्द असलो तरी, तुझ्या अखंड बडबडीत शब्द सुचवत असतो,  अबोल भावना का होईना, तुझ्या शब्दात जाणवत असतो....