मन खुप चंचल असते, सहजासहज ते कधी स्थिर होत नाही. नेहमी मनामध्ये विचारच वादळ थैमान घालत असते, कधी शांत न राहणार आपलं मन ऐक सुंदर विश्व निर्माण करते.
ते सुंदर अद्भुत विश्व म्हणजे कल्पना. मात्र या कल्पनेच्या जगाला वास्तवाची सोबत नसते. या कल्पनेच्या जगात आपण आपल्या मनाने जगतो,राहतो. आपण जे वास्तवात ऐकू शकत नाही, पाहू शकत नाही. ते आपण कल्पनेच्या जगात पाहतो आणि ऐकतो.
कल्पनेच्या जगात विचाराचं बंधन नसते, आणि जगण्याला मर्यादा नसते, सगळं काही अमर्याद असते, ते असते आकाशातल्या पक्षासारखं स्वच्छंद चारही दिशा फिरून येणार. कल्पनेच्या जगात कोणाचे कोणावरी बंधन नसतात, ते असतं हळवस आपलंच एक जग.
कल्पना हे अतिशय रम्य, अद्भुत जग आहे, कल्पनेत अस्तित्वात असलेले जग. वास्तवाच्या जगापेक्षा सुंदर विश्व कल्पनेच..
By-S.Bhure.
sundar
ReplyDelete