Skip to main content

Posts

युद्ध

  रागात रंजून, रणभूमीवर रणध्वनी, आरंभ झाला युद्धाचा, अशांतिची घडी. संस्कृतींचे संघर्ष, विश्वासांची लढाई, विजयाची आस, मरणाची घाई. गीतासारखी गजल, युद्धाची गाथा, सांस्कृतिक संग्राम, इतिहासाला साक्षी. रक्तरंजित रणभूमी, रणकंदिल रणगाथा, विजय किंवा पराजय, कोणाला मिळेल माथा?
Recent posts

माझ्या मना

माझीया मना गुंतलोय मी  तिच्या शब्दात निशब्ध झालो  मी तिला ऐकण्यात अलगत गुंतवून घे मला  तूझ्या नात्यात   रंगलो मी अंतरी  तुझ्या रंगात  कसा हा मोती शिंपल्यात गावला  माझीया मना तिने कहर माजवला  घे ओंजळीत हात माझा जीवाचा   हक्क दे मला तुझ्यासाठी झुरण्याचा.

पूर्ण शांतता........

 आज मला शांत राहायचं आहे, नाही बोलणार, ना कुठे जाणार मला शांती हवी आहे.असं करून होईल का शांत आपण, हे तर मि तुमच्यावरचं सोडते.बर शांतता म्हणजे काय? नेमक हवं तरी काय?आवाज नष्ट झाल्यानंतर असलेली ती शांतता, सरळ सोप्या भाषेत एवढेच, माणूस वरुन कितीही शांत असल्या सारखं वागत असेल तरी तो मनातून अशांतच असतो. जी माणसं समाधानी असेल ती माणसं सुखी माणसं आहे असं म्हणता येईल,म्हणजेच मि याला शांत मनुष्य समजणार, तृप्त झालेला.आता त्याला काहीच नको, पण अशी शांतता प्राप्त करण्यासाठी आपल्याला सतत स्वतःशी लढत राहावं लागणार आहे. मग बघा कोण जिकंणार तर तुमचा स्वार्थ कि तुमची समाधानी वृत्ती,       मला अजूनही माझ्या गुरुजींची एक गोष्ट आठवते, त्यांनी म्हटलं होत कि, पूर्ण शांतता ही स्मशानाच्या पायरीवर जाऊन मिळते. मनुष्य जेव्हा सरणार रचवला जातो. तेव्हा तो पूर्ण शांततेत विलीन होतो. पण माझ्या मते, तो तर आपला शेवट ठरतो ना. तेव्हा तर शांतता मिळनारचन,पण जो पर्यंत आपलं आयुष्य आहे तो पर्यंतच्या काळात आपण शांतता म्हणजेच समाधान नाही मिळवू शकत का? म्हटलं तर आपल्याला जे हवं जे आपल्याला ऐकायचं आहे तेच आपल्या...

एकटेपणा

                    ऐकला चलो रे............... असं म्हणायला काही नाही वाटतं.कारण एकटेपणा हा स्वतःशी स्वतःच नातं घट्ट करणारा असतो,असं आपण म्हणतो.पण एकटेपणा हा खूप भयावक असते, ना डोळ्याला झोप ना मनाला चेन, नाही  उ्सुकता. असते तर फक्त निराशा, इच्छेने भरलेला भावुक पुतळा.               गोंधळ, कल्ला ऐकून चिडचिड होत असली तर, आपण वैतागून जातो. असं वाटते एकांतात कुठेतरी निघून जावं, दूरदूर पर्यंत आपल्या जवड कोणी दिसायलाच नको. पण एकांत हा एकटेपणा नसतो, एकांत हा आपल्याला काही वेळे पर्यंतच हवा असतो. मग तो नकोसा होतो.पण एकांत हा वेळेपूरता मर्यादित नसेल तर त्याच रूपांतर एकटेपणात होते.           लहानपणी सुद्धा आपल्या सोबत कोणी ना कोणी खेळायला हवं असत. आपले आईवडील किंवा आजीआजोबा असतातच त्यानंतर थोडे मोठे झालो कि शेजारचे मित्रमैत्रीनि सोबत खेळतो. मगतर शाळा, कॉलेज मध्ये आपली मैत्री इतरांशी होते. म्हणजेच लहानपणा पासून आपण एकटे राहणं टाळतो. दुःखात रडायला कुणाचा खांदा मिळतोच,खचलेल्या, भयावक झाले...

मनातील विचार........

                दिवस सरत गेला, महिना पूर्ण झाला, पाहता पाहता वर्ष हातातून निघून गेलं. रोजच हा विचार मनात येते. कि, वेळ निघून जात आहे. माझं स्वप्न केव्हा पूर्ण होणार, होणारही कि नाही, हाच विचार मनातं सतत फिरत आहे, कधी कधी तर रडावंसं वाटते, का माहीत नाही पण असं वाटते,आईजवड जावं आणि मनसोक्त रडून मन हलक करून घ्यावं आणि आई  डोक्यावरून हात फिरून म्हणणार,सगळं ठीक होणार रडू नको.. केल असंही करून पाहिलं, शेवटी खूप प्रयत्न करूनही. माझं स्वप्न माझ्या जवड येतेना दिसत नाही. सतत मी जितके जवड जायला निघते तितके ते माझ्या दूरदूर पळताना दिसते.             काय करावं, कस करावं, कोणाला सांगावं,अशी परस्थिती निर्माण होते. कधी कधी तर स्वतःवरच हसू येते. आणि स्वतःलाच म्हणते का कशाला मी असा प्रश्न करते,असं म्हणून फक्त मी माझ्या म्हणाला शांत करण्याचा प्रयत्न करते.असं वाटते हे मनातील सुरु असणारे विचार एकदम बंद व्हावे, लगेच ऐकावेळी, म्हणून मनाला फसवण्याचा प्रयत्न करते, पण मन काही समजण्यास तयार नसते. शेवटी करायच ते मलाच करावं लागेलन. मला हे विच...

वेगळेपण

 बोलावे एकदा या निशब्द मनाने उधवस्त करावे या वादळाने जीवनात गुंतलेला गुंता तोडावा शब्दआघाताने मावळून घ्यावे काळीज माझे या क्षितिजाणे अपेक्षाचा जाळ  करावा या काळोखाने....                          कधी कधी हे समजणे खूप अवघड होते कि आपल्याला काय झाले आहे,आणि  जे झाले आहेत ते लवकरात लवकर कळले तर फारच चांगले,सगळ्या व्यक्ती सारख्या नसतात, त्यांच्यात आचार विचार, स्वभाव, आवडी निवडी, राहणी, वागणे अश्या कित्येक बाबतीत एक व्यक्ती इतर व्यक्ती पेक्षा वेगळी असते, आणि हे वेगळेपण समजून घेणे गरजेचं असते,पण वेगळेपण समजून घेणे हे सहजासहज सोपे नसते, आणि ते वेगळे पण समजुनही घेतले तरी ते स्वीकारणे फार अवघड असते.                      म्हणून ज्या दिशेने या समाजाचा प्रवाह वाहत जातो आपण त्यात सामावून वाहत जात असतो, या प्रवाहत वाहत असताना आपल्यात असणार वेगळेपण आपल्या आड येते , बऱ्याच गोष्टी आपल्या मनाविरुद्ध असतात आणि मनाविरुद्ध जाण आपल्याला मान्य नसते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्य...

प्रवित्र तुळशी माळ..

                    साधारण दिसणारी ही तुळशी माळ भक्ती,शक्ती,सामर्थ्य, शांती, एकाग्रतेणे ने भरलेली असते, ज्याला हवा तो त्याचा तसा उपयोग करतो,धारण करतो.                                      तुळशी माळ धारण करणारी व्यक्ती ही साधू किंवा महाराज असते असे नाही आहे, बऱ्याच लोकांच्या मनात हा गैरसमज असतो. साधारण व्यक्ती तुळशी माळ धारण करू शकते, पण फॅशन म्हणून तुळशी माळ धारण करू नका.                 तुळशी माळ धारण करणे म्हणजे पुण्यप्रद समजले जाते, कारण तुळशी माळ ही गुरु शिवाय धारण करू नये, गुरुदेव जेव्हा गुरु मंत्र आपल्या कानात सांगते आणि आपल्याला माळ धारण केली जाते तेव्हा त्याला माळेचे आपल्याला फळ प्राप्त होईल.               अंतःकरणात सामर्थ्य समाविष्ट होते,म्हणून फॅशन च्या प्रवाहात तुळशी माळेला वाहून नका नेऊ, गुरु शिवाय तुळशीमाळ धारण करणे अयोग्य आहे.         ...