ऐकला चलो रे............... असं म्हणायला काही नाही वाटतं.कारण एकटेपणा हा स्वतःशी स्वतःच नातं घट्ट करणारा असतो,असं आपण म्हणतो.पण एकटेपणा हा खूप भयावक असते, ना डोळ्याला झोप ना मनाला चेन, नाही उ्सुकता. असते तर फक्त निराशा, इच्छेने भरलेला भावुक पुतळा.
गोंधळ, कल्ला ऐकून चिडचिड होत असली तर, आपण वैतागून जातो. असं वाटते एकांतात कुठेतरी निघून जावं, दूरदूर पर्यंत आपल्या जवड कोणी दिसायलाच नको. पण एकांत हा एकटेपणा नसतो, एकांत हा आपल्याला काही वेळे पर्यंतच हवा असतो. मग तो नकोसा होतो.पण एकांत हा वेळेपूरता मर्यादित नसेल तर त्याच रूपांतर एकटेपणात होते.
लहानपणी सुद्धा आपल्या सोबत कोणी ना कोणी खेळायला हवं असत. आपले आईवडील किंवा आजीआजोबा असतातच त्यानंतर थोडे मोठे झालो कि शेजारचे मित्रमैत्रीनि सोबत खेळतो. मगतर शाळा, कॉलेज मध्ये आपली मैत्री इतरांशी होते. म्हणजेच लहानपणा पासून आपण एकटे राहणं टाळतो. दुःखात रडायला कुणाचा खांदा मिळतोच,खचलेल्या, भयावक झालेल्या मनाला कुणी तरी उभारी देतेच कारण आपण स्वतःला नातं म्हणव की कुटूंबात अडकवून घेतो. काहीही नसेल सगेसोयरे नसेल तरीही माणसं कुत्र, मांजरी पाळतातच त्यांच्या सोबत आनंद वाटतात, पण ऐकटेपणा टाळतात.
लहानपणा पासून एकटेपणाची सवय नसते म्हणून आपण एकटेपणाला भितो. सहाजिकच आहे..आणि हो कुटूंबव्यवस्था हा एकटेपणावर एक छानसा उपाय ठरतो.असं मला वाटते. आणि एकटेपणावर उपाय शोधायचा म्हणलं तर एकमेव उपाय म्हणजे कोणाची तरी सोबत. बघा, एकटेपणा म्हटलं कि माझ्या डोळ्यासोमोर चित्रस उभ राहत एकं रखरखीत वाळवंट!नुसता एकच आवाज एकच दृश्य दुरदूरपर्यंत कोणी नाही फक्त मि आणि माझी सावली थकलेली, भिलेली,
खरच एकटेपणा हा कोणाच्या वाटेला नको यायला. पण असे असते का सगळे सारखेच अं हं कोणाच्या ना कोणाच्या वाटेला हे वाळवंट येतेच. आणि एकटेपणाची जखम घेऊनजगणारी माणसं पाहिली कि मला अश्वत्थामाची आठवण येते....
शेवटी असे म्हणावे वाटते कि, ह्या घराच्याच्या चार भिंती एक मि आणि बाहेरून येणारा आवाज यात काय संवाद होणार?............. जाऊदे होतील सवय या एकटेपणाची, नाहीतरी माझ्या जवड दुसरा उपाय तरी काय असे म्हणून एकटेपण जगले जाते..................................
khup chan
ReplyDeletelokanchya mnatl lihl..khr aahe
ReplyDeleteMnatil vichar 🙏👌
ReplyDelete