तुझ्या आठवांनी झोप चोरली, ही रात्र का संपत नाही, मी मनात बोलतो तुझ्याशी, पण तुझं उत्तर का येत नाही. तुझी चाहूल लागते, आणि हवा गोंजारते काही, मी डोळे मिटतो सावकाश, पण स्वप्नात तू दिसतच नाही. तुझं नाव लिहायचं, हात थरथरतो का कुणास ठाऊक, मी आकाशात शोधतो तुला, पण तारा सुद्धा ओळखत नाही. तुझ्या सुगंधात हरवायचं, हे मन रोज ठरवतं, पण दरवेळी त्या वाऱ्याला तुझं ठिकाण सापडतच नाही. तुझं नाव लिहिलं तरी, शब्द का जळत जातात, मी मनात ओतलं पाणी, ते डोळ्यातून का वाहतं. हे असं चालूच राहिलं तर, शब्दही दमून जातील, पण मी तुझीच वाट पाहत कविताच होत जाईन.
हवी सोबत सोबतीला मनीषा अशी रुजली, न उमगले चंद्रकोरी सोबत काजव्यांची मिळाली....