Skip to main content

शब्दांची शस्त्रं


शब्दांची शस्त्रं ती, कोणीही चालवावी,

प्रेमाने चालली तर, सृष्टी फुलवावी…


वाऱ्यासारखी मोकळी, जशी मुक्त गाणी,

कधी वज्राहून कठोर, कधी सोज्वळ पानी…


शब्दांनी बांधलेले, जग किती सुंदर,

पण ह्याच शब्दांनी, होई जखमी अंतर…


कधी स्पर्श जाहला, ओलावा अश्रूंचा,

कधी पेटते मनी, ज्वाला अन्यायाची…


एखादा शब्द उगाच, आयुष्यभर बोचतो,

एखादा शब्द असा, की जीव सावरतो…


शब्द ही संपत्ती, तुला देऊनी गेली,

तू शस्त्र कर की स्नेह, निवड तुझीच केली…

Comments