Skip to main content

Posts

Showing posts from October, 2025

सखे साजणी

  सखे साजणी, तू सवय झाली, उगाच मनास भुलवू नको, गेल्या गगनी या सावल्या जरी, पावसास वेडावू नको.. तुझ्या सहवासी मंद वारे, पारिजातही फुलला गडे, स्मरते मजला बोल तुझे ते, पायवाटही खुलली गडे! सांज सभोती झुळूक हलकी, तुझीच चाहूल लागली जशी, स्वप्नांमध्येही तूच यावी, सावली झालीस जशी! मज दूर जाऊ नकोस गं आता, सोसत नाही विरहाचे वारे, सखे साजणी, तू सवय झाली, राहशील ना तू माझ्याच द्वारे?

राहू दे

  राहू दे ना काही गोष्टी तशाच, उगाच उकरून कशाला बघायचं? कधी काही ओळी अपुऱ्या असतात, त्या पूर्ण करायला कशाला धडपडायचं? राहू दे काही प्रश्न हवेत विरून, उत्तरांमधून काही बदलत नसतं, कधी कधी शांततेलाच आवाज असतो, शब्दांचं ओझं माणसाला पेलत नसतं. राहू दे काही आठवणी धुसर, पुन्हा रंग भरायला वेळच कुठे? काही जखमा असतात ताज्याच छान, ओठांवर आणलं तर फिक्याच पडतं. राहू दे. बोलायचं नाही ना काही? फक्त बसायचं शांत, मोगऱ्याच्या गंधात, काही विरलं, काही टिकून राहिलं, बाकीचं सगळं, उगाच शब्दांवर टाकू नकोस हात.