तुझ्या निरागस हसण्यात मी भान हरपून बसतो, तुझ्या पाऊलखुणात मी हळवीशी वाट शोधत असतो. तुझा शब्द छोटा का होईना, माझ्या हृदयात घर करून असतो, प्रयत्न का होईना, पण तुझे इवलेसे मन जपत असतो. निशब्द असलो तरी, तुझ्या अखंड बडबडीत शब्द सुचवत असतो, अबोल भावना का होईना, तुझ्या शब्दात जाणवत असतो....
हवी सोबत सोबतीला मनीषा अशी रुजली, न उमगले चंद्रकोरी सोबत काजव्यांची मिळाली....